पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहापूरमध्ये वृक्षारोपण; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती
1 min read

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहापूरमध्ये वृक्षारोपण; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती

Loading

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहापूरमध्ये वृक्षारोपण; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती

 

मुंबई प्रतिनिधी

 

आज दिनांक 05/06/2026 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्याने कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे *आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे* सर यांनी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र डाकी साहेब व कार्यकर्त्यांसमवेत *”जागतिक पर्यावरण दिन”* निमित्ताने *”भव्य वृक्ष लागवड”* कार्यक्रम शहापूर तालुक्यातील वाशिंद, येथील दहागाव स्वामी समर्थ मठाच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पाडला.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की पृथ्वीचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. या सर्व गोष्टी भारत देश पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे महत्वाच्या ठरतात यावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र डाकी साहेब, श्री भास्कर जाधव ,श्री अशोक इरणक, दीपक बोंबे, सतीश सापळे, निशिगंधाताई बोंबे, श्री खारीक सर ,श्री किरपण सर, श्री शैलेश गोळे सर, अरुण घोडविंदे ,देवेंद्र भेरे सर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *