हरित क्रांतीकडे एक पाऊल; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
1 min read

हरित क्रांतीकडे एक पाऊल; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

Loading

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील RAWE कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, वृक्षारोपण, जलसंधारण तसेच प्रदूषण नियंत्रण याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. दिपक प्रमिला चंद्रकांत कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी (वर्ग-२) उपस्थित होते. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद केले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाद्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश सदार आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. कार्तिक खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमात पावबा खंडू पानपाटील, मयुरेश संजय पाटील, गणेश विनोद पाटील, अजिंक्य पाटील, जयेश खांगर, अन्सारी साद फैज आदी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *