राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न
1 min read

राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न

Loading

राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव

शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तसेच पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील उर्फ राजू सर यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथील अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांना स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीकेंद्री उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य तसेच सहकार क्षेत्रातील योगदान याबद्दल त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.

पुरस्कार वितरण सोहळ्याला शिक्षक आमदार सत्यजित तांबे, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी काशीद, महाराष्ट्र सल्लागार प्रदीप सोनवणे, विराज कावडीया, रणजित सोनवणे, एच. जी. इंगळे, गोविंदा पाटील आणि जितेंद्र बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र पाटील उर्फ राजू सर यांनी अध्यापन क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजू सर यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे अमळनेर तालुका, शिक्षकवर्ग तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजू सर यांचा हा सन्मान अमळनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद असून शिक्षक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *