भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा , एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव
1 min read

भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा , एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव

Loading

भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा

एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी- ईश्वर महाजन):
भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील सामाजिक ऐक्य, परस्पर प्रेम आणि सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम असलेल्या सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळी बापूसाहेब विलास हिम्मतराव पाटील यांच्या घरासमोरील चौकात मोठ्या उत्साहात करण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १८ मान्यवर बंधूंचा सामूहिक वाढदिवस साजरा करत परिसरातील नागरिकांनी एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी या उपक्रमामागील मूळ संकल्पनेला वंदन केले. पूर्वीच्या गुरुजनांनी प्रशासकीय सोयीसाठी १ जून ही तारीख निश्चित केली होती. मात्र या तारखेमागे केवळ औपचारिकता नसून “एकत्र येणे हाच खरा उत्सव” हा सामाजिक संस्कार दडलेला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

गुरुजनांच्या दूरदृष्टीला अभिवादन

यावेळी वक्त्यांनी संत कबीर, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनांचा उल्लेख करत समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. भालेरावनगर आणि पाटीलगढीत वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिकरीत्या आयोजित केले जातात. या परंपरेमुळे परिसरात एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

१८ मानकऱ्यांचा सामूहिक गौरव

यावेळी वाढदिवसाचे मानकरी असलेल्या खालील १८ बंधूंचा पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून सत्कार करण्यात आला.

१) मा. विलास हिम्मतराव पाटील (रणाईचेकर)
२) परमेश्वर पाटील (लोणकर)
३) अनिल दुसाने (शिरूडकर)
४) रमेश चव्हाण (रणाईचेकर)
५) विनोद वैद्य (अमळनेरकर)
६) शिवाजी पाटील (आर्डीकर)
७) दीपक वाघ (दहिवदकर)
८) युवराज यशवंत वानखेडे (वालखेडा)
९) हरिश्चंद्र कढरे दादा (निमकर)
१०) डी. जी. पाटील (वेळोदेकर)
११) संजय बोरसे (मेहूटेहू)
१२) गुलाब बोरसे (लोणकर)
१३) गोपाळ आत्माराम सोलंकी (एलआयसी शाखा प्रबंधक)
१४) रविकांत पाटील (चहावाले)
१५) प्रकाश मन्साराम पाटील (वाघोदेकर)
१६) राजेंद्र नाना पाटील (आर्डीकर)
१७) डी. एम. पाटील (जानवेकर)
१८) सदाशिव पौलाद पवार (साळवेकर)

विविध व्यवसाय, पदे आणि क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या सर्व मान्यवरांनी आपल्या कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

मान्यवरांचे अभिष्टचिंतनपर मनोगत

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बापूसाहेब संदीप पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी केले. यावेळी प्राचार्य पी. के. पाटील, गोपाळ सोलंकी, माजी नायब तहसीलदार रामचंद्र उपासनी, अमळनेर नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रशांत दादा निकम, विजय पाटील आणि सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख आबाश्री गोकुळ पाटील यांनी अभिष्टचिंतनपर भाषणे करत वाढदिवसाच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

गीतगायन, पोवाडा आणि सांस्कृतिक रंगत

कार्यक्रमात उज्ज्वल पाटील (इंजिनिअर), महेंद्र काटे, संतोष पाटील आणि हरिश्चंद्र कढरे दादा यांनी स्वरसुमनांची उधळण करत गीतगायन केले. तसेच मिलिंद पाटील यांनी रहिवाशांच्या कार्याचा गौरव करणारा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

केक कापून शुभेच्छांचा वर्षाव

सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरलेल्या सामूहिक केक कापण्याच्या कार्यक्रमात सर्व १८ मानकरी एकत्र उभे राहिले. टाळ्यांच्या गजरात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मेडिकल ऑफिसर विलासराव पाटील यांच्या सुकन्येने सर्व मानकऱ्यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

एकीचे बळ जपणारा प्रेरणादायी उपक्रम

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी भालेरावनगर व पाटीलगढीतील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर प्रेम कायम राखण्याचा संकल्प व्यक्त केला. या सामूहिक वाढदिवस सोहळ्याने परिसरातील नागरिकांना एकत्र आणत “एकीमध्येच शक्ती आहे” हा संदेश पुन्हा अधोरेखित केला.

यावेळी भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *