पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल
1 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल

Loading

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल

अमळनेर प्रतिनिधी:- शहरात अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी तालुका अमळनेरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते बस स्टँड जवळील अहिल्यादेवी स्मारकावर पूजन होऊन रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण करत रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी डॉ अनिल शिंदे,युवा मोर्चा प्रदेश चिटणीस भैरवी वाघ पलांडे,माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी,मार्केट संचालक भोजमल पाटील,एल टी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, नगरसेवक दादा पवार,विजय कहारू पाटील,भरतसिंग परदेशी,गिरीश सोनजी पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी समाज अध्यक्ष
मच्छीन्द्र लांडगे,हरचंद लांडगे,मोहन सातपुते,
नितीन निळे,गोविंद कंखरे,नाना धनगर,मोहन,समाधान धनगर,सुयोग धनगर,प्रदीप कंखरे,जीभाऊ कंखरे,प्रभाकर लांडगे,पंडित लांडगे,बन्सीलाल भागवत,रमेश देव, एस सी तेले,देवा लांडगे,निखिल बोरसे, सतीश धनगर,पंडित लांडगे,धनराज कंखरे,निलेश लांडगे यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र साळुंखे आणि दीक्षा महेंद्र साळुंखे यांच्या पुढाकारातून पार पडले. उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील,वंदना रामकृष्ण पाटील, मुख्य सल्लागार मोहन मोरे, सुधाकर गजे, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, ललित सातपुते, राजू धनगर आणि शेजत खाटीक यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *