गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ
![]()
‘गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ
अमळनेर प्रतिनिधी
: मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुरेश बाविस्कर, सहसचिव श्री.दिलीप बहिरम, खजिनदार श्री. गिरीशजी कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ. मीना शहा उपस्थित होते.
मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या अभियानास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गो-संवर्धन व गो-सन्मानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी स्वखुशीने अभियानाला पाठिंबा दर्शवत आपली नोंदणी व स्वाक्षरी केली.या अभियानाच्या माध्यमातून गोमातेच्या संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. मंदिर परिसरात दिवसभर भाविकांचा उत्साह आणि सहभाग पाहायला मिळाला.“गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे; तिच्या सन्मानासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे,”असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला.

