महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद
![]()
महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी —
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. अमळनेरच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-30 मध्ये महिला मतदारसंघातून सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या उमेदवारीची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे.
माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या संचालिका म्हणून कार्य करताना सुषमाताई देसले पाटील यांनी ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून सर्वसामान्य नागरिक, महिला बचतगट आणि शेतकरी वर्गात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या सुषमाताई देसले पाटील या नेहमीच समाजहिताला प्राधान्य देत आल्या आहेत.
त्यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याला त्यांचे पती डीवायएसपी वासुदेव देसले (नाशिक ग्रामीण) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे बोलले जात आहे. तसेच आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनलकडून महिला मतदारसंघासाठी त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
महिला मतदारसंघातून त्या “कपबशी” या चिन्हावर निवडणूक लढवत असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य सभासदांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान शनिवार दि. 30 मे 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत साने गुरुजी शाळा, अमळनेर येथे होणार आहे. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांना “कपबशी” चिन्हासमोरील फुलीवर शिक्का मारून सर्वोच्च मतांनी विजयी करावे, असे आवाहन सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

