अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी , डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन
![]()
अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी
*डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन*
**अमळनेर प्रतिनिधी :** अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. पंचवार्षिक निवडणूक 2025-30 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले **देविदास महादू पाटील (डी. एम. पाटील)** यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली आहे. त्यांच्या उमेदवारीला माजी आमदार **डॉ. बी. एस. आबा पाटील** तसेच उपनगराध्यक्ष **प्रशांत निकम** यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. बी. एस. आबा पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींना मतदान करून डी. एम. पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. “शेतकरी, सहकार आणि सर्वसामान्य सभासदांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणे ही काळाची गरज आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
डी. एम. पाटील यांनी यापूर्वी अमळनेर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकारी उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे, सहकारी संस्थांना बळकटी देणे आणि ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे.
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या व्यक्तिशः मतदार संघातून निवडणूक लढवित असलेल्या डी. एम. पाटील यांना मतपत्रिकेवर **“छत्री”** हे चिन्ह देण्यात आले असून मतपत्रिकेचा रंग पांढरा राहणार आहे. मतदारांना एकूण पाच मते देण्याचा अधिकार आहे.
यावेळी डी. एम. पाटील यांनीही मतदारांना भावनिक आवाहन करताना सांगितले की, “आपल्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सभासदांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी द्यावी. आपल्या नावासमोरील ‘छत्री’ चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करावे.”
### *मतदानाची माहिती :*
🗓️ **शनिवार, 30 मे 2026** ⏰ **सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत** 📍 **स्थळ : साने गुरुजी शाळा, अमळनेर**

