अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!*
1 min read

अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!*

Loading

*अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!*

अमळनेर (प्रतिनिधी)​ अमळनेर शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.
​शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत अमळनेरच्या सलोख्याची संस्कृती अधोरेखित केली. तसेच कब्रिस्तानात जाऊन पूर्वजांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.
​”नाद विसरून भेदाचा, संदेश देऊ प्रेमाचा…” हाच अमळनेरकरांचा सलोख्याचा संदेश आजच्या काळाची गरज आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *