अमळनेरात संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी, महाभंडारा, सामूहिक आरती व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती; कार्यकर्त्यांचा सत्कार
![]()
अमळनेरात संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी
महाभंडारा, सामूहिक आरती व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती; कार्यकर्त्यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाभंडाऱ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करण्यात आली. आरतीनंतर संत भिमा भोई यांच्या विचारांना अभिवादन करून समाज एकजुटीचा संदेश देण्यात आला.
भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधवांनी या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांसह युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही भक्तीभावाने उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढविली. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे आणि भाऊसाहेब महाजन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे आणि प्रवीण शिंगाणे यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.
जयंतीनिमित्त आयोजित महाभंडाऱ्यात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून समाजबांधवांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

