जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश अनिल बोरनारे यांच्या निवेदनावर ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे निर्देश
![]()
जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश
अनिल बोरनारे यांच्या निवेदनावर ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे निर्देश
अमळनेर प्रतिनिधी)
जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक देऊन देण्याचे निर्देश ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन ने सोसायट्यांना दिले आहेत
या विषयाबाबत शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन ला निवेदन देऊन जनगणना चे काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातील सोसायटी व रहिवाशांनी सहकार्य करून सन्मानाची वागणूक द्यावी असे निवेदन दिले होते या निवेदनावर कार्यवाही करत ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ने जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था यांनासुद्धा असे निर्देश दिले आहेत
राज्यात सध्या उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांना या उन्हाचा मोठा फटका बसत आहे
अशातच काही सोसायटीमध्ये प्रवेश नाकारणे माहिती न देणे असे प्रकार घडत असून शिक्षकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे जनगणनेचे काम हे एक महिना सुरू राहणार असून या कामासाठी शिक्षकांच्या सेवा जनगणना संचालयाने मोठ्या संख्येने अधिग्रहित केलेल्या आहेत
आपल्या हक्काच्या सुट्टीवर पाणी सोडून जनगणने सारख्या राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांना जेवढे दिवस जनगणनेचे काम केले आहे तेवढे दिवस बदली रजा मंजूर करून सदर रजा त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंदवण्यात यावे यासोबतच या शिक्षकांना शासनाकडून प्रवास भत्ता व सन्मानपत्र देण्यात यावे अशीही मागणी शिक्षक महासंघाने राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांकडे केली असल्याचे शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले

