शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता ,महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास
![]()
“शिक्षकांचे कैवारी” आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; संघर्षातून मिळवून दिली शालार्थ मान्यता
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रंजित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास
रायगड | प्रतिनिधी
“गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,” अशी भावना रायगड जिल्ह्यातील रंजित रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. संघर्ष, आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे पार करत अखेर त्यांना शालार्थ आयडी मान्यता मिळाली असून, हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रंजित कदम हे वडाचीवाडी, पोस्ट-वावेदिवाली, ता. माणगाव, जि. रायगड येथील रहिवासी असून त्यांची नियुक्ती को. ए. सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा, काळसुरी, ता. म्हसळा येथे कनिष्ठ लेखनिक पदावर अनुकंपा तत्त्वावर झाली होती. नियुक्तीनंतर वैयक्तिक मान्यता आणि पुढील शासकीय प्रक्रिया कशी पूर्ण करावी, याबाबत त्यांना कोणतेही मार्गदर्शन नव्हते.
यावेळी रातवड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना रायगड विभागाचे कार्यकर्ते श्री. राजेंद्र पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या या संघटनेच्या माध्यमातून कदम यांना मोठा आधार मिळाला.
श्री. पवार यांनी कोणताही आर्थिक व्यवहार न करता, पूर्ण प्रामाणिकपणे व कार्यतत्परतेने कदम यांची वैयक्तिक मान्यता मिळवून दिली. त्यानंतर शालार्थ आयडी प्रक्रियेतही विविध त्रुटी, कागदपत्रांची पूर्तता आणि कार्यालयीन टप्पे पार करत अखेर दिनांक १३ मे २०२६ रोजी मुंबई येथील उपसंचालक कार्यालयात त्यांना अधिकृत मान्यता आदेश प्रदान करण्यात आला.
या वेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण उपसंचालक श्री. राजेश कंकाळ, श्री. सावंत साहेब, श्री. गोमासे सर, श्री. बेरे सर तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. बेरे सर यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घेतल्याने कदम यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
“संघटनेने दिलेला विश्वास, मार्गदर्शन आणि माणुसकीचा आधार यामुळेच माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्याला न्याय मिळाला,” अशा भावना व्यक्त करत रंजित कदम यांनी श्री. राजेंद्र पवार, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच आपल्या शाळेतील मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांचे ऋण मानले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना ही केवळ संघटना नसून, अनेकांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.



