मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती ,यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा
1 min read

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती ,यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा

Loading

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती

यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा

 

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण गावाने शिक्षण व कर्तृत्वाचा मानाचा तुरा रोवला असून, प्रताप ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी चिरंजीव यशपाल पवार याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पदावर निवड मिळवली आहे. त्याची पहिली पोस्टिंग श्रीनगर येथे झाल्याने संपूर्ण तालुक्यासह गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्ट्स विभागातून शिक्षण घेतलेल्या यशपालने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.

यशपालच्या या यशाबद्दल त्याच्या निवासस्थानी जाऊन मान्यवरांनी त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी प्रताप कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख आदरणीय प्रा. आर. एम. पारधी सर, मराठी विभाग प्रमुख प्रा. मंदाकिनी भामरे मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच लोणचारम, राणी लक्ष्मीबाई कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय सुरेश विक्रम पाटील, एकरुखीचे सरपंच तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, आदरणीय अनिल प्रतापराव पाटील (निवृत्त शिक्षक, लोणचारम) तसेच श्री. रजनीकांत नवल भामरे, मुख्याध्यापक आदिवासी आश्रम शाळा ताडेपुरा उपस्थित होते.

मान्यवरांनी यशपालला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, “तुझ्या हातून समाजसेवा व देशसेवा घडावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुझ्या यशातून प्रेरणा मिळावी,” असा आशीर्वाद दिला.

यशपाल पवारच्या या उल्लेखनीय यशामुळे मठगव्हाण गावासह अमळनेर तालुक्याचा नावलौकिक उंचावला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *