आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट  ,उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश;
1 min read

आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट ,उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश;

Loading

आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट

उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश;

अमळनेर:-येथील ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने बंद असलेले स्वच्छतागृह , तुटलेले दरवाजे, नवीन बांधकामाची संथगती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उपजिल्हा रुग्णालयासाठी वरील मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. सदर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.बांधकाम सुरू असल्याने वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह सुरू करण्यासह दुरुस्ती व दरवाजांची तुटफुट तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचनाही दिल्या.रुग्णालयातील बेडशीट अस्वच्छ असल्याने याबाबतही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.औषधालयासह प्रत्येक विभागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत काही सूचना त्यांनी केल्या. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.व रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रकाश ताळे यांच्या कडून त्यांनी संपूर्ण आढावा घेतला.

उष्माघात कक्षाबाबत केल्या सूचना

अमळनेर तालुक्यात उष्णतेमुळे काही बळी जात असल्याने उष्माघात कक्षाची आमदारांनी पाहणी केली.यासाठी कुलर,थंड पाणी व पुरेसा औषधी साठा आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत,जितेंद्र ठाकूर,विजय पाटील,जयेश पाटील उपस्थित होते.तर रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रकाश ताळे,वैद्यकीय अधिकारी डॉ जि. एम.पाटील,डॉ.संदीप जोशी,डॉ.प्रशांत शिंदे,डॉ.सुमित पाटील,डॉ परेश पाटील,बांधकाम अभियंता भागवत माळी यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *