डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभेचे आयोजन
![]()
डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा.
जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी तथा नागरी आरोग्य केंद्राचें वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिद्धार्थ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली…
आज दिनांक-१६ मे २०२६ शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या अवचित्य साधून, चोपडा नागरी आरोग्य केंद्रात.. डासांमुळे होणारा डेंग्यू, चिकूनगुणिया आणि हिवताप या किटकजन्य आजारांविषयी उपस्थित नागरिकांना तथा रुग्णांना.. प्रतिबंधात्मक उपाय योजना व आरोग्य विषयक माहिती सांगून हस्तपत्रिकादेऊन, डेंग्यू या अजराबाबत जनजागृती करण्यात आली.
आजच्या 16 मे हा डेंग्यु दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, वरील डेंग्यु आजारांबाबत नागरिकांना माहिती देऊन त्या आजारापासून उपाय योजना व काळजी घेण्याची सवय लावणे हा आहे.
प्रसंगी तालुका हिवताप पर्यवेक्षक- जगदीश बाविस्कर, यांनी तालुका आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख
यांनी उपस्थित सर्व नागरिक तथा रुग्णांना डेंग्यू आजाराविषयी सविस्तर माहिती द्वारा समुपदेशन केले,
डेंग्यू: हा आजार एडीस या डासांमुळे होतो. सकाळी व संध्याकाळी चावणाऱ्या या डासांपासून बचावासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये, वापरायची पाण्याची भांडी झाकलेली ठेवावीत, रात्री संध्याकाळी दारखिडक्या लवकर बंद करून घ्यावेत जेणे करून डास घरात प्रवेश करणार नाहीत, मच्छरदाणी वापरावी, गुडनाईट लिक्विड, मच्छर अगरबत्ती वापरावी, दार खिडक्यांना जाळी बसविण्यात यावी,
परिसरात पाणी साचलेलं असल्यास डबक्यात डास अळी खाणारे गप्पी मासे सोडावे, गटारीत पाणी तुंबल्यास वंगण ऑइल टाकावे आदी उपाय योजना राबविण्यात याव्यात.
मलेरिया: अनोफिलीस या डासामुळे होतो. तापासोबत थंडी व घाम येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो.
ग्रामस्थांना दर आठवड्याला घराभोवती पाणी साचलेले ठिकाण तपासण्याचे व स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.
शेवटी सर्व उपस्थितांनी व नागरिकांनी “माझे गाव– आरोग्य संपन्न गाव” ही शपथ घेतली आणि आपल्या कुटुंबीयांनाही डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाचे संदेश पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
तसेच आरोग्य पथकाकडून देखील
जनजागृतीपर रॅली काढण्यात आली, नागरिकांना आवाहन करण्यात आले की अजाराबाबत जागृत राहून आपल्याकडे कोणत्याही आरोग्यविषयक सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व कंटेनर तपासणी करून घेण्यात यावी, व आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा हे आवर्जून सांगितले.
आदी मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
प्रसंगी.. वैद्यकीय अधिकारी-डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिद्धर्थ साळूखे,
औषध निर्माण अधिकारी-अजय जैस्वाल, नदीम शेख फरीद
आरोग्य सेवक- रामलू मडावी, अशोक वारे, आरोग्य सेविका-बिनासिस्टर, तथा सर्व आरोग्य सेवक, सर्व आरोग्य सेविका, गट प्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका आणि मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक उपस्थित होते.

