जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न*
1 min read

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न*

Loading

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न*

जळगाव, दि. १४ ऑगस्ट २०२६ जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून *जळगाव ,गटशिक्षणाधिकारी मा .अजितजी तडवी साहेब, मा . जितेंद्रजी चिंचोले साहेब,विस्तार अधिकारी मा.बेलदार साहेब होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यानिकेतन विद्यालय जि .प. जळगाव येथील *प्राचार्य सौ.सुनीता गरुड मॅडम उपस्थित होते. , तालुका विज्ञान समन्वयक *श्री. गोपाळ महाजन सर, सौ. भाग्यश्री तळेले तसेच तालुक्यातील विविध शाळांचे विज्ञान शिक्षक उपस्थित होते*.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भाग्यश्री तळेले,प्रास्ताविक श्री.गोपाल महाजन व आभार श्री.गणेश फिरके यांनी केले.

या विज्ञान मेळाव्यात जळगाव तालुक्यातील एकूण २० शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध संकल्पना, प्रयोग, समस्या-आधारित विचार व नाविन्यपूर्ण मांडणीद्वारे आपले सादरीकरण केले.
मेळाव्यातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे . १) वीरेन सतीश अहिरे(का. ऊ .कोल्हे विद्यालय,जळगाव) २) पूर्वजा नितीन तायडे(प्रगती माध्यमिक शाळा, जळगाव). उत्तेजनार्थ.तेजस्विनी पाटील,प्रसाद जैन,वैभवी चव्हाण,स्नेहा खोडपे. यात प्रथम दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली. तर उत्तेजनार्थ म्हणून.
या मेळाव्या मा .एस.बी.कुलकर्णी.सर, मा.गणेश फिरके सर,सौ.माधुरी कोल्हे मॅडम यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे मूल्यमापन करून मार्गदर्शन केले.

मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची, वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची आणि आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. तालुक्यातील विज्ञान शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *