न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न , महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; योग, प्राणायाम व शुद्धीक्रियांचे विनामूल्य प्रशिक्षण
1 min read

न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न , महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; योग, प्राणायाम व शुद्धीक्रियांचे विनामूल्य प्रशिक्षण

Loading

न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; योग, प्राणायाम व शुद्धीक्रियांचे विनामूल्य प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी
: के. सी. ई. सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागामार्फत अमळनेर शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले सात दिवसीय योगशिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

दि. 27 एप्रिल 2026 ते दि. 3 मे 2026 या कालावधीत दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत हे योगशिबीर पार पडले. शहरातील विविध परिसरातील महिला भगिनींनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेत योग, प्राणायाम व आरोग्यविषयक प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या योगशिबिराचे उद्घाटन योगशिक्षिका सौ. पुनम शशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक, योग प्राध्यापक डॉ. देवानंद सोनार सर तसेच प्राध्यापिका सौ. ज्योती वाघ मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.

योगशिक्षिका सौ. पुनम पाटील यांनी शिबिरादरम्यान प्रशिक्षणार्थींना विविध योगासने, प्राणायाम तसेच शुद्धीक्रिया यांचे प्रभावी प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सहभागी महिलांकडून प्रत्यक्ष सराव करून घेत योगाचे शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले.

विशेष म्हणजे हे संपूर्ण योग प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे महिलांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला.

शिबिराच्या समारोपप्रसंगी सौ. पुनम पाटील यांनी उपस्थित महिलांना योग व प्राणायामाचे मानवी जीवनातील महत्त्व, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी त्यांची गरज आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन योगाभ्यासाची आवड वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *