नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा
1 min read

नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा

Loading

नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल..
गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा

धरणगाव तालुक्यातील नांदेड इंग्लिश स्कूल, नांदेड या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या निकालात गरीब घरच्या मुलींनी गुणवत्ता पूर्ण बाजी मारली आहे. आपल्या पालकांच्या कष्टांना सार्थक ठरवत तसेच सुटीच्या दिवशी शेतात काम करत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेत सर्वप्रथम तनिका रमाकांत अहिरे ९०.८० गुण, द्वितीय सृष्टी समाधान धनगर ८९.०० गुण, तर ८८.२० गुण मिळवून साक्षी सुनील सोनवणे आणि तनिषा समाधान सैंदाणे यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक मिळवला आहे.
विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांसह जाऊन मुख्याध्यापक ए बी वाडीले यांनी पालक व विद्यार्थीनींचा सत्कार केला. शाळेचे शिक्षक पी व्ही पाटील, एम आर निकम, एस एस महाजन, व्ही डी अत्तरदे, ए जे गावीत, डी वाय ब-हाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नांदेड सहकारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विवेक काशिनाथ पाटील, उपाध्यक्ष प्रकाश मधुकर पाटील, सचिव राजेश दत्तात्रय अत्तरदे, सहसचिव अनिल विठ्ठल पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी गुणवंत व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
४१ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. १३ विद्यार्थ्यांनी ७० पेक्षा जास्त गुण मिळवले आहे. चार विद्यार्थ्यांनी ६० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
निखिल भारंबे, स्वप्निल ब-हाटे, धिरज पाटील, गौरव ब-हाटे, गुंजन पाटील, भाग्यश्री नेमाडे यांचे सहकार्य लाभले. नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल त्यात विद्यार्थ्यांचे भरभरून यश व गुणगौरव याचे परिसरातील सर्व थरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *