ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*
जळगाव दि. ०९/०५/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात एस.एस.सी. परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा कान्हा ललित केंद्र सभागृह, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी के. सी. ई. सोसायटीचे संचालक डॉ. ए. आर. राणे, के. सी. ई. सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री केतन चौधरी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, ज्येष्ठ शिक्षक श्री महेंद्र नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रम, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यश संपादन करताना पालक, शिक्षक व विद्यालयाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले. तसेच विद्यालयाची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरा भविष्यातही अशीच वृद्धिंगत होत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, अभिनंदनपत्र व टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर शाळेचे, पालकांचे व जळगाव शहराचे नाव उज्ज्वल केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कृष्णा सागर झांबरे (९६%), कु. भूमिका गोपाळ चौधरी (९५%), कार्तिक दत्तात्रय पवार (९४.४%), कु. सोनाक्षी प्रवीण पाटील (९३.८%), करण भूषण पाटील (९३.४%), अलख निरंजन वाणी (९३.४%), साईराज समाधान पाटील (९३%), कु. वृषाली किरण असोदेकर (९३%), गिरीश मनोज सोनवणे (९२.६%), सत्यम देवराम महाजन (९२.४%), भूमिक सतीश पाटील (९२.४%), कु. योगिनी विनोद महाजन (९२.२%), कु. प्रतिज्ञा हरीश प्रजापति (९२%), निवृत्ती ज्ञानेश्वर राठोड (९१.८%), कु. दृष्टी संदीप ढगे (९१.६%), कु. प्रेरणा प्रवीण गोसावी (९१.२%), निलेश पृथ्वीराज देशमुख (९०.८%), कु. उर्वशी योगेश शेटे (९०.६%) व निखिल दामोदर धारकर (९०.४%) यांचा समावेश होता.
या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, प्रेरणादायी व गौरवशाली वातावरणात पार पडला.

