योग्य व संतुलित आहार सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली — डॉ.अमित चित्ते.
1 min read

योग्य व संतुलित आहार सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली — डॉ.अमित चित्ते.

Loading

योग्य व संतुलित आहार सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली — डॉ.अमित चित्ते.

जळगांव प्रतिनिधी:
वयाच्या चाळीशीनंतर व्हिसेरल फॅट हा मानवी जीवनशैलीवर प्रभाव करणारा महत्त्वाचा घटक आहे. योग्य व संतुलित आहार, व्यायामाची सातत्यता, पूर्णवेळ झोप, तसेच ताणविरहित मानसिकता ही सुदृढ मानवी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.मधुमेहापासून शरीराला वाचविण्यासाठी नियंत्रित जीवनशैली व आहार हा उत्तम उपाय आहे. असे प्रतिपादन जळगांव शहरातील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ.अमित चित्ते यांनी केले. ते आज स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभ व सरस्वती पुजनाने झाली. प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे समिती अध्यक्ष प्रा.छाया चौधरी यांनी समिती निर्मितीची रूपरेषा मांडत समितीची उपयुक्तता विषद केली.यावेळी डॉ.अमित चित्ते यांनी ‘चाळीशीनंतरचे आरोग्य’ या विषयावर अमूल्य माहिती देताना तेलकट तुपकट पदार्थ टाळावेत, नियमित अंतराने रक्त तपासणी करावी,स्ट्रेस न घेता काम करावे, पॅकेज बंद, जंक फूड टाळावे, लिफ्टचा वापर न करता, जिन्याने ये जा करावी असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या प्रा.राजश्री महाजन यांनी आपल्या मनोगतात मांडले की, उत्तम जीवनशैली यामुळे आपण संभाव्य आजाराला दूर ठेवू शकतो. यावेळी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे, समन्वयक प्रा.उमेश पाटील व प्रा गुणवंत वंजारी यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपम निळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *