माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
![]()
माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
दहावी शालांत परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे विद्यालयाचा निकाल 93.33 % लागला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बाळासाहेब उत्तम चव्हाण यांनी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी जयेश समाधान कोळी( 81.60%) याचा गुलाबपुष्प व पेढ्याचा घास भरवून सत्कार करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी प्रांजली प्रेमराज पाटील ( 70.20%)हिचा सत्कार तसेच पालकांचा सत्कार विद्यालयाचे उपक्रम शिक्षक आदरणीय श्री अरविंद माळी सर यांनी प्रेमराज दादा यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी विवेक रामकृष्ण सोनवणे ( 69.80%)यांचा सत्कार विद्यालयाचे कलाशिक्षक आदरणीय श्री के. आर. साळुंखे सर यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपक्रम शिक्षक श्री अनिल मनोरे सर यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बाळासाहेब उत्तम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक उत्तुंग यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.
या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय श्री जगदीश प्रभाकर पाटील उपस्थित होते. तसेच श्री अरविंद माळी, श्री कैलास साळुंखे, श्री अनिल मनोरे, श्री संजय सयाजीराव पाटील, श्री विजय नेरपगार, श्री विलास भटू पाटील व श्री हिम्मत गोकुळ पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

