*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम*
जळगाव दि. ८/०५/२०२६ – के. सी. ई. सोसायटी सञ्चलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) मार्च २०२६ मधील एकूण निकाल ९५.७० टक्के इतका लागून विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या निकालामुळे संपूर्ण परिसरात आनंद, समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून ८४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यालयातून कृष्णा सागर झांबरे याने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, कु.भूमिका गोपाल चौधरी हिने ९५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कार्तिक दत्तात्रय पवार याने ९४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
के. सी. ई. सोसायटी जळगाव चे अध्यक्ष श्री. प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली यावर्षीची परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हे घवघवीत यश संपादन केले, ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल के. सी. ई. सोसायटी चे अध्यक्ष श्रीमान प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विद्यालयाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

