दहावीनंतरचे करिअर ? नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार.
![]()
दहावीनंतरचे करिअर ?
नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार.
जळगाव: नुकताच १० वीचा निकाल लागला असून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १० मे रोजी सकाळी १०:०० वा करण्यात आलेले आहे. सदर सेमिनार नोबेल फाउंडेशन सभागृह विद्युत कॉलनी दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ हायवे लगत नायरा पेट्रोल पंपाच्या मागे संपन्न होणार आहे.
.या अंतर्गत आयआयटी प्रवेश परीक्षा तसेच मेडिकल प्रवेश परीक्षेबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहे .याप्रसंगी प्रसिद्ध करिअर तज्ञ प्रसिद्ध लेखक जयदीप पाटील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अंतर्गत राज्यकर निरीक्षक पदी निवड झालेले राहुल पाटील उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील सर यांनी केलेले आहे. माहिती आणि नाव नोंदणीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

