लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा
1 min read

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा

Loading

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा

जळगाव प्रतिनिधी-जीवनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील छोटेसे खेडेगाव लोणे येथील सागर गणेश पाटील यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे .नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी राज्यात दहावा क्रमांक प्राप्त करून यशाला गवसणी घातलेली आहे. या यशाबद्दल नुकताच नोबेल फाउंडेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सागर पाटील यांनी आपले प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण धरणगाव येथे पूर्ण केले आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर जळगाव पोलीस दलात त्यांनी नोकरी प्राप्त केली. मात्र स्वप्न हे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायचे होते त्यामुळे पोलिसाची 24 तास नोकरी सांभाळून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू केला 2022 मध्ये परीक्षा दिली तेव्हा फिजिकल ची तयारी करताना गुडघ्याला प्रचंड दुखापत झाली वजन जास्त असल्यामुळे संपूर्ण ताण एकाच गुडघ्यावर पडला. तीन महिने पलंगावर सागर पडून होता. मात्र 2023 मध्ये पुन्हा जाहिरात निघाले अगदी पन्नास मीटर दोन दोन पाऊल चालण्यापासून सागरने पुन्हा प्रयत्न सुरू केले खूप वेदना आणि त्रास सहन करून सागर हळूहळू 100 मीटर 200 मीटर चालू लागला सरावामुळे आपल्या धावण्याची शक्ती त्यांनी प्राप्त केली आपले वजन त्यांनी तब्बल वीस किलोने कमी केले.
लोणे येथील शेतकरी गणेश वामन पाटील आणि शोभा पाटील यांचे सागर हे चिरंजीव आहेत. सातत्यपूर्ण परिश्रम योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे यश प्राप्त झाले .या यशामध्ये आई,वडील तसेच सागर पाटील यांच्या पत्नी काजल पाटील यांचा मोठा वाटा आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सागर पाटील यांचे यश अत्यंत प्रेरणादायी आहे .सागर यांच्या यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नक्कीच ऊर्जा मिळेल .या यशाबद्दल नुकताच नोबेल फाउंडेशन तर्फे सागर पाटील यांचे आई-वडील आणि सागर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .यावेळी नोबेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील, रमेश पाटील ,अक्षय देवरे ,सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *