ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय- आमदार ॲड. निरंजन डावखरे.
![]()
ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे.: आमदार ॲड. निरंजन डावखरे.
ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित
ग्लोबल खान्देश महोत्सव जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या “पुष्प चौथे” कार्यक्रमाला नागरिकांनी अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रेमाची उधळण केली. खान्देशच्या मातीचा सुगंध, खाद्यसंस्कृतीची चव आणि सांस्कृतिक वैभव अनुभवण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
या दिवशी पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांनी महोत्सवास भेट देत कौतुकाची थाप दिली.
कपिल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्लोबल खान्देश महोत्सव खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ झाला असून आगरी, मराठवाडा, विदर्भ अशा विविध भागांतील स्टॉल्स पाहून मन समाधानाने भरून येते.”
तर कोकण विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांनी “येणारी गर्दी ही खान्देशच्या मातीवर आणि खाद्यसंस्कृतीवर असलेल्या प्रेमाची जिवंत साक्ष आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
स्वागताध्यक्ष श्री उमेश बोरगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कल्याण आणि खान्देश यांच्यातील घट्ट ऋणानुबंध उलगडून सांगितले.
महापौर सौ. हर्षाली चौधरी यांनीही महोत्सवाबद्दल बोलताना सांगितले की, “हा महोत्सव इतका भव्य आणि उत्साही आहे की, इथून निघावेसेच वाटत नाही. असा उत्साह मी प्रथमच अनुभवत आहे.”
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला:
प्रदीप अहिरे, राहुल गांगुर्डे, कु. श्रद्धा महिरे यांना खान्देशश्री पुरस्कार तर
प्रसिद्ध उद्योजक श्री सुनील चौधरी यांना खान्देश उद्योगरत्न पुरस्कार
आयत पयत सख्या फेम प्रवीण माळी यांना खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांनी आपले प्रसिद्ध नाटक व्यासपीठावरून सादर करताना सर्व उपस्थितांची मन जिंकली.
तसेच याप्रसंगी इंदला शैक्षणिक ग्रुपचे अध्यक्ष डॉ.विजय महाजन, बी. एन. पाटील, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका. स्नेहा शेडगे, प्राचार्य सविता पेंडसे, डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांसह खान्देशातील विविध ज्ञाती समाज मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवली.
जनतेचा ओसंडून वाहणारा प्रतिसाद, उत्साहाची लाट आणि खान्देशी संस्कृतीबद्दलची अपार आस्था याच गोष्टी या महोत्सवाच्या यशाचे खरे गमक ठरल्या.
*ग्लोबल खान्देश महोत्सव केवळ एक कार्यक्रम नसून, तो खान्देशी अस्मिता, एकात्मता आणि संस्कृतीचा जिवंत उत्सव बनला आहे* असे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.उत्तर महाराष्ट्र खानदेश महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष बापूसाहेच हटकर
उपाध्यक्ष एल. आर. पाटील, प्रदिप अहिरे, एन. एम. भामरे, दिगंबर बेंडाळे प्रा. प्रकाश माळी
सचिव : दिपक पाटील सहसचिव प्रा. किशोर पाटील, सुभाष सरोदे, अमोल बोरसे
खजिनदार: श्री. ए. जी. पाटील सहखजिनदार संजय बिलाले, एस. एन. पाटील
सल्लागार भरत गाडे, रघुनाथ भदाणे, गणेश भामरे,सुनिल चौधरी
महोत्सव समितीचे सदस्य अनिरूध्द चव्हाण,सतीश पाटील, डी. व्ही. पाटील,जगदिश पाटील,मुषण चौधरी, भरत पाटील, मंगेश भामरे, विशाल बाबा, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी
सांस्कृतिक मंच: प्रमुख श्री. विनोद शेलकर, सहप्रमुख सौ सुनिता बोरसे, ठाणसिंग पाटील, प्रा. विजय पाटील, सौ. चेतना भालेराव, श्री. रतीलाल कोळी, रविंद्र शिंपी, सौ. स्मिता पाटील सौ. हेमलता देसले, सौ. योगिता सोनावणे, सौ. आशा वाडीले, श्रीरंग अत्रे,सजावट करण्याचे कार्य प्रमुख मनोहर भामरे, यशवंत महाजन, सुधाकर भामरे, कैलास सरोदे, निलेश महाजन
कार्यालयीन मंत्री सुनिल पाटील, विनायक सन्सासी संपर्क प्रमुख प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख
जळगांव:प्रविण सनेर नंदूरबार मिलींद बागुल धुळे शरद शिंदे,कल्याण (प.) : प्रभाकर बोरसे,विभागप्रमुख
डोंबीवली (प.): प्रा. मगन सुर्यवंशी
कल्याण (पू.) गुलाबराव पाटील भिवंडी जी. ओ. माळी
डोंबीवली (पू.) सुजित महाजन ठाणे शहर :अनिल चौधरी
बदलापूर विश्वनाथ पाटील
नवी मुंबई:संजय वाघ
मिरा भाईंदर किशोर पाटील
पालघर डॉ.अरूण पाटील
टिटवाळा आशिष भदाणे
अध्यक्षा सौ. वैशाली पाटील
महिला आघाडी
कार्याध्यक्ष: सौ आशा भामरे उपाध्यक्षा सौ. सुनंदा वाघ
सचिव : सौ. वर्षा पाटील सहसचिव सौ. भावना महाजन खजिनदार सौ. दिपाली चव्हाण
सल्लागार सौ. कमल पाटील, सौ. सुमन पाटील कार्य करीत आहेत.
संपर्क प्रमुख म्हणून सौ. उज्वला पाटील, सौ. प्रांजल बागुल.प्रसिध्दी प्रमुख म्हणून सौ. नलिनी पाटील, कु. वैदेही पाटील सदस्या सौ. अपर्णा बिलाले, सौ. निता पाटील, सौ. संगिता इंगळे, सौ. अर्चना सरोदे, सौ. मनिषा पाटील,
सौ. नुरजहाँ तहवी, सौ. मृणाली शेलकर, सौ. हेमलता मनेर, सौ. सुरेखा सन्यांशी, ही सर्व टीम कठोर परिश्रम घेत आहे.

