अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
![]()
अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी)
कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर, पारनाका या शाळेत आज श्री सत्यनारायण महापूजा व विविध उपक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन व सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळेचा माहितीपट पीपीटी च्या माध्यमातून पाहुण्यांसमोर सादर करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश व मागच्या वर्षभरात शाळेत घडून आलेल्या विविध बदलांचे निवेदन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून विवेकजी केले (अध्यक्ष, टीम ग्लोबल, अंधेरी, मुंबई) तसेच मिलिंदजी देशमुख (पदाधिकारी, टीम ग्लोबल, अंधेरी, मुंबई) उपस्थित होते. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.तरटे सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.फडके सर, सरचिटणीस माननीय डॉ. निलेश रेवगडे, कोषाध्यक्ष माननीय विश्वास सोनवणे, चिटणीस माननीय सौ.नीला दामले मॅडम, माननीय सौ.सारिका कुलकर्णी मॅडम, कार्यकारिणी सदस्य माननीय श्री.मिलिंद कुलकर्णी, माननीय श्री. कांगणे सर तसेच अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आवर्जून उपस्थित होते.
टीम ग्लोबल, अंधेरी, मुंबई यांच्या सौजन्याने शाळेच्या अंतर्गत रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी नवीन बेंचेस तसेच विद्यार्थिनींसाठी कौशल्यविकास उपक्रम म्हणून ब्युटी पार्लर व शिवणकला प्रशिक्षण विभाग सुरू करण्यात आला आहे. या नवीन विभागांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून शाळेच्या प्रगतीस नवीन दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवटी मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.

