खवशी येथील नाल्यावरील बंधारा मोजतोय अखेरची घटका  
1 min read

खवशी येथील नाल्यावरील बंधारा मोजतोय अखेरची घटका  

Loading

खवशी येथील नाल्यावरील बंधारा मोजतोय अखेरची घटका
अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार)

गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर २००३ साली जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुनर्भरण साठी मोठ्या बंधाराची निर्मिती करण्यात आली. परंतु हा भाग काळी मातीचा येत असल्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा जोर असल्याने सदर बांधाला पर्यायी मार्गावर वाहू लागला. सदर नाल्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर येत असल्यामुळे बाजूचा भाग कोरला गेल्यामुळे बंधारा किती वर्षापासून ओसाड पडलेला आहे. हा बांधारा अस्तित्वात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा साठत होता, व पाण्याचे पुनर्भरण मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे परिसरातील विहिरी अथवा कुपनलिकांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बंधारा दुरुस्ती अभावी पडल्याने दरवर्षी लाखो लीटर पाण्याचा विसर्ग होत असतो. तरी या बांधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी कारण जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग न होता पाणी पुनर्भरण होऊन परिसरातील जलपातळी चांगल्या प्रमाणे वाढू शकते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या बंधाऱ्यावरील लोखंडी काठोडे सुद्धा जागेवरून गायब आहेत.

तरी संबंधित विभागाने यावर लक्ष देऊन पावसाळापूर्वीच या बंधार्‍याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *