विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंगांची उधळण; पातोंडा शाळेत कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात!
1 min read

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंगांची उधळण; पातोंडा शाळेत कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात!

Loading

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला रंगांची उधळण; पातोंडा शाळेत कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात!

विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कलाकृती; उपक्रमातून सृजनशीलतेला मिळाला नवा वाव

अमळनेर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच स्वप्नील शिंदे व सागर भोई उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक वस्तू, हस्तकला, उपयुक्त साहित्य व कार्यानुभवाशी निगडित आकर्षक नमुने सादर केले. प्रत्येक कलाकृतीतून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि मेहनत स्पष्टपणे जाणवत होती.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी “विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होऊन आत्मविश्वास वाढतो,” असे मत व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे असे उपक्रम शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *