उन्हाच्या तडाख्यातही हिरवाईचा पहारेकरी – संभाजी पाटील यांची जिद्द कौतुकास्पद!
1 min read

उन्हाच्या तडाख्यातही हिरवाईचा पहारेकरी – संभाजी पाटील यांची जिद्द कौतुकास्पद!

Loading

उन्हाच्या तडाख्यातही हिरवाईचा पहारेकरी – संभाजी पाटील यांची जिद्द कौतुकास्पद!

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमधील शिक्षकेतर कर्मचारी संभाजी अभिमान पाटील यांनी एप्रिलच्या कडक उन्हातही शाळा परिसरातील झाडांची जपणूक करण्याचे स्तुत्य काम हाती घेतले आहे. शाळेच्या पटांगणासमोरील झाडांना नियमित पाणी घालणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणे हे काम ते मनापासून करत आहेत.
नळांना पाणी आले की सर्वप्रथम झाडांची तहान भागवण्याला प्राधान्य देणाऱ्या संभाजी पाटील यांच्या या कार्यातून पर्यावरणाबद्दलची त्यांची जाणीव आणि समर्पण दिसून येते.
त्यांच्या या हिरवाई जपण्याच्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, सचिव श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन सर, शिक्षकवृंद आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी यांनी मनापासून कौतुक केले आहे.
शाळेच्या परिसरात हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी एका कर्मचाऱ्याची अशी निस्वार्थ सेवा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. 🌿

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *