झाडीहून पेटली फुले विचारांची मशाल; द्विशतक वर्षाचा प्रेरणादायी प्रारंभ
1 min read

झाडीहून पेटली फुले विचारांची मशाल; द्विशतक वर्षाचा प्रेरणादायी प्रारंभ

Loading

झाडीहून पेटली फुले विचारांची मशाल; द्विशतक वर्षाचा प्रेरणादायी प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षाचा प्रारंभ अमळनेर तालुक्यातील झाडी येथे प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक उत्साहात करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून ११ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या वर्षभराच्या उपक्रमांची सुरुवात १८ एप्रिल रोजी आखाजीच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या एकपात्री नाट्यप्रयोगाने झाली.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, अभियान प्रमुख प्रा. डॉ. लीलाधर पाटील आणि झाडी येथील प्रा. डॉ. विलास पाटील यांच्या समन्वयातून तालुकाभर विविध वैचारिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम म्हणून अहिराणी भाषेतील एकपात्री नाट्यप्रयोग “आयतं पोयतं सख्यानं” (कलावंत – प्रवीण माळी, शिरपूर) सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामान्य शेतकरी श्री वसंतराव साहेबराव पाटील यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक भास्करराव साहेबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एलआयसी शाखाधिकारी श्री सदानंद अहिरराव उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ नाटकातून सामाजिक प्रबोधनाची वाट उघडली, याच विचारांचा वारसा पुढे नेत झाडीतील नाट्यपरंपरेचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नाट्यकलावंत सुभाष श्रीराम पाटील, लोटन राजाराम पाटील, गणेश विठ्ठल पाटील, मोगल रुस्तम पिंजारी, रामकृष्ण दयाराम पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
तसेच समाजकार्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापिका उषाताई भदाने, बचतगट प्रमुख सुषमा ज्ञानेश्वर पाटील, शेतीदूत प्रतिभा महेश पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका नीता पाटील, माधुरी पाटील, मदतनीस प्रतिभा पाटील व राजश्री पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रा. अशोक पवार, विश्वास पाटील, वसुंधराताई लांडगे, सीमाताई रगडे, बापूराव ठाकरे, महेशकुमार पारेराव, प्रेमराज पवार, संजय पाटील, पत्रकार मिलिंद पाटील, सुनील चुडामण पाटील, विजय शेखनाथ पाटील, श्याम भास्कर पाटील, रवींद्र भरत पाटील, साहेबराव सयाइस यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ–संभाजी ब्रिगेड शाखा झाडी यांना विविध मित्र मंडळांच्या तरुणांनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक प्रा. विलास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी मानले.

फुले विचारांच्या जागृतीची ठिणगी झाडी येथून पेट घेत, आता संपूर्ण तालुक्यात प्रबोधनाची ज्योत तेजोमय होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *