१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!*
1 min read

१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!*

Loading

*१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!*

अमळनेर:-जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रारींचा भडिमार झाल्यानंतर अमळनेर नगरपरिषद येथे दिनांक 20 एप्रिल रोजी झालेली सर्वसाधारण सभा कोणत्याही विषयावर *चर्चा न करता अवघ्या १० मिनिटांत आवरून पळ काढत ‘उरकण्यात’* आल्याने शहराच्या राजकारणात हा मोठा स्फोट असल्याचा आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी करत हा *“पूर्वनियोजित खेळ व लोकशाहीची थेट गळचेपी”* असल्याचे संबोधत संताप व्यक्त केला.
नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार अजेंड्यावर 27 विषय घेण्यात आले होते,यात शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे असतानाही बैठक सुरू होताच घाईघाईने संपवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अमळनेर *शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना एकही मुद्दा मांडू न देता थेट बैठक संपल्याची घोषणा करण्यात आली आणि सर्व विषय सत्ताधाऱ्यांच्या “बहुमताने” मंजूर केल्याचा दावा करण्यात आला.* यामुळे “हे सर्व आधीच ठरलेलं होतं का?” असा थेट सवाल विरोधी गटाने उपस्थित केला आहे.तसेच“जनतेचे प्रश्न दाबण्यासाठीच सभा १० मिनिटांत गुंडाळली,” असा गंभीर आरोप करण्यात आला.“नगरसेवकांना बोलू दिलं नाही, म्हणजे लोकशाहीला कुलूप लावलं,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नगरसेवकांनी दिली.या घडामोडींमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक नगरसेवकांनी हा प्रकार “लोकशाहीचा उघड अपमान” असल्याचे सांगत प्रशासनावर जोरदार टीका केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने *या प्रकारामागील जबाबदारांवर कारवाई, तसेच संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी* शवीआचे व अपक्ष नगरसेवक ,राजू फाफोरेकर, भरतकुमार ललवाणी, देवेंद्र कांबळे,सचिन पाटील,सौ स्वप्ना विक्रांत पाटील,योगिता सयाजीराव कापडणे, अफसाना मुक्तार खाटीक, जुबेदाबी हाजी नसीर, कविता विजय राजपूत,शोभाबाई गढरे नंदाताई नरेंद्र संदानशिव, विजय कहारु पाटील, आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *