आखाजीचा जलवा, राज्यभर दुमदुमणार नाव! , पांडे म्हणाले – “महोत्सवाला देऊ राज्यस्तरीय मान”
![]()
आखाजीचा जलवा, राज्यभर दुमदुमणार नाव!
पांडे म्हणाले – “महोत्सवाला देऊ राज्यस्तरीय मान”
अमळनेर प्रतिनिधी- ‘अक्षय्य तृतीया’ अर्थात” आखाजी’ या सणाचा वारसा जपण्यासाठी “आखाजी महोत्सवाला” राज्यस्तरीय दर्जाचा मान देवून पुढील वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केले. अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने अहिराणी वाडमय दिनानिमित्त झालेल्या भव्य ‘आखाजी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते काल बोलत होते.
खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष म्हणून बाजार समितीचे सभापती अशोक पाटील होते. प्रमुख वक्त्या म्हणून अहिराणी लेखिका प्रा. डॉ. योगिता पाटील (धुळे) यांनी ग्रामीण संस्कृती अन आखाजी महोत्सव या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी जि. प. सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, मराठी वाङ्मय मंडळचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, डॉ अनिल शिंदे, रा.काँ. ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष रिता बाविस्कर, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, जयवंतराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, बाजार समितीचे माजी संचालक ज्ञानेश्वर धनगर, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे , प्राचार्या रत्नाताई पाटील, रमेश बोरसे, साहित्यिक कृष्णा पाटील, हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिनेश नाईक, ए टी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान अहिराणी शब्द व संस्कृती वाङ्मयावर डी ए धनगर व उमेश काटे यांनी ‘चालता बोलता’ हा बौद्धिक मनोरंजनात्मक प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेतला. यावेळी ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी अस्सल गावराणी खाद्य पदार्थ आणि वस्तूंचे विविध स्टॉल देखील लावण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी प्रास्ताविक केले. पूनम बेडसे व संजय पाटील यांनी सूत्रसंचालन तर जिल्हा सचिव उमेश काटे यांनी आभार मानले.
चौकट
आखाजी महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी लोककला, गाणी, रूढी- परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रत्येक विजेत्याला गौराई, प्रमाणपत्र, प्रथम ५ हजार ,द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार रोख बक्षीस देण्यात आले.
झोक्यावरील स्पर्धा
प्रथम – मेघा पवार, दिपीका विलास पाटील, द्वितीय – रेखा भागवत, पुजा अधिकार, तृतीय – कविता पाटील, योगिता पांडेखापरवरची पुरणपोळी स्पर्धा
प्रथम- प्रतिभा चौधरी, द्वितीय – नयना पाटील, तृतीय – मंगला सोनवणेआखाजी,गौराई आरास स्पर्धा
प्रथम – माँसाहेब जिजाऊ संघ, द्वितीय – स्वामी समर्थ संघ, तृतीय – माता धनदाई संघचालता बोलता प्रश्न मंजुषा स्पर्धा
प्रथम अनिता बोरसे, निर्मला भदाणेवेशभूषा अन उखाणे स्पर्धा
प्रथम – विजयाताई पाटील, द्वितीय – पल्लवी पाटील, तृतीय – राजश्री नेरकरघट्या वरील गाणे
प्रथम – रंजना महाजन, चित्रकला महाजन, द्वितीय – लताबाई दुसाणे, आशाबाई दुसाने, तृतीय – शामल पाटील, कल्पना देवरे (धुळे)
——
अमळनेर – आखाजी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी, अशोक पाटील व मान्यवर
—–

