प्रलंबित प्रश्नांवर थेट धडक!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पालघर शिक्षण विभागात आक्रमक बैठक; 3 तासांत अनेक प्रश्न निकाली
1 min read

प्रलंबित प्रश्नांवर थेट धडक!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पालघर शिक्षण विभागात आक्रमक बैठक; 3 तासांत अनेक प्रश्न निकाली

Loading

“प्रलंबित प्रश्नांवर थेट धडक!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पालघर शिक्षण विभागात आक्रमक बैठक; 3 तासांत अनेक प्रश्न निकाली

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागील महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या शैक्षणिक प्रश्नांवर अखेर ठोस हालचाल झाली असून, कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागात धडक देत आक्रमक भूमिका घेतली. शुक्रवार, 17 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या बैठकीत तब्बल तीन तास सखोल चर्चा करत अनेक प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यात आला.
जिल्हा परिषद पालघर येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. मातेकर तसेच वेतन अधीक्षक श्री. मोहिते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी आमदार म्हात्रे यांनी शिक्षकांच्या समस्या केवळ मांडल्याच नाहीत, तर त्यावर तत्काळ तोडगा निघावा यासाठी प्रशासनाला धारेवर धरत ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले.
बैठकीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये नोंद, संचमान्यतेतील पददुरुस्ती, शून्य शिक्षक असलेल्या संचमान्यतेतील विसंगती, विनाअनुदानित ते अनुदानित बदली मान्यता, मुख्याध्यापक-पर्यवेक्षक-शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, टप्पा वाढ अनुदान आदेश, शिक्षक समायोजन, तसेच वेतन रखडलेल्या शाळांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः 1 व 2 एप्रिलच्या शासन आदेशामुळे अपात्र ठरलेल्या शाळांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण आणि सेवा सातत्याचा मुद्दा यावरही जोरदार पाठपुरावा करण्यात आला.
या आक्रमक पाठपुराव्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा निघाला असून, न्याय मिळाल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. बैठकीनंतर शिक्षकांनी आमदार म्हात्रे आणि शिक्षण विभागाचे आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव अरुण भोईर, राज्य उपाध्यक्ष राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष महेश कुडू, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डिमेलो, तसेच विविध पदाधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शिक्षकांच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढणारे आमदार” अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त करत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्यशैलीचे जोरदार कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *