एम.एच.एफ डी.ए.च्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद  निरोगी समाजाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स आसो.चे एक कृतिशील पाऊल !
1 min read

एम.एच.एफ डी.ए.च्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद निरोगी समाजाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स आसो.चे एक कृतिशील पाऊल !

Loading

एम.एच.एफ डी.ए.च्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निरोगी समाजाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स आसो.चे एक कृतिशील पाऊल !

अकोला-
समाजातील असाध्य रोगांचे निदान आणि उपचार करून समाजाला उत्तम शरीरस्वास्थ लाभावे या उदात्त संकल्पनेने महाराष्ट्र होमिओपॅथिक महिला डॉक्टर्स असोसिएश कृतीशील कार्यक्रमांनी पुढे आली आहे.याच विधायक उध्दीष्टाचा एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत सशक्त निरोगी सशक्त समाजाच्या उभारणीसाठी संवेदनशीलतेने उचललेले एक प्रेरणादायी पाऊल म्हणून एका भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स असोसिएशन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हे मोफत दंत तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिर अकोला येथे सिध्दी कॅम्पवरील सरकारी गोडाऊन जवळ श्री डेंटल क्लिनिक येथे भव्य प्रमाणात संपन्न झाले.रूग्णांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या यशस्वी शिबीरात अनेक रूग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.

डॉ. माधुरी राठोड यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रभाग क्र. १६ चे नगरसेवक श्री. सिद्धार्थभाऊ उपरवट व सौ. आम्रपाली ताई उपरवट यांच्या सहकार्याने, तसेच डॉ. स्वाती राठोड (शिरसाट) यांच्या सुयोग्य समन्वयातून या शिबिराचा गरजू रूग्णांना आवश्यक तो लाभ झाला.त्यामुळे या उफक्रमाची उल्लेखनिय फलनिष्पत्ती झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉ. कल्पना भिसे उपस्थित होत्या. त्यांनी त “निरोगी समाज हाच सशक्त राष्ट्राचा पाया” हा विचार आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडत,आरोग्यजागृतीच्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिरामध्ये दंत तपासणी, विविध आजारांचे निदान, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच होमिओपॅथिक औषधांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवांचा लाभ घेतला. अध्यक्ष डॉ. कल्पना भिसे, उपाध्यक्ष डॉ. हेमलता लद्दड, सचिव डॉ. हर्षलता कोले, सल्लागार डॉ. अस्मिता देशमुख व समन्वयक डॉ. स्वाती राठोड तसेच डॉ. उषा खर्चे पाटील, डॉ. रुपाली खारोडे, डॉ. वैशाली दोसे, डॉ. गुलबक्षी मोहोकार, डॉ. प्रियंका अग्रवाल, डॉ. कल्पना धोटे यांनी सेवाभावी वृत्तीने नागरिकांची तपासणी करून मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सौ योगिताताई पावसाळे, श्री पंकज गावंडे, मोहम्मद रफीक सिद्दिकी, सय्यद वसीम, फैयाज खान, श्री गजानन सोनोने, श्री आनंद बलोदे,अॕड. श्री धनंजय धबाले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. रोगांच्या उत्पत्तीपूर्वीच त्याला प्रतिबंध करण्यासाठी योग्य वेळी तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यास अनेक आजार टाळता येतात. हेच आरोग्याचे खरे गमक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्यजागृतीची नवी दिशा निर्माण होते.असे महत्वपूर्ण विचार लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी शैलीतून श्री सिद्धार्थभाऊ उपरवट, श्री. मोहड साहेब व प्रा. रोहण शिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन सौ. आम्रपाली ताई उपरवट यांनी केले. सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरलेल्या या उपक्रमातून “निरोगी समाज- सशक्त राष्ट्र” हा संदेश अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *