विचारांचे दीप प्रज्वलित! वत्साई आयटीआयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,  विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख; मान्यवरांची उपस्थिती
1 min read

विचारांचे दीप प्रज्वलित! वत्साई आयटीआयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी , विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख; मान्यवरांची उपस्थिती

Loading

विचारांचे दीप प्रज्वलित! वत्साई आयटीआयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख; मान्यवरांची उपस्थिती

अमळनेर (प्रतिनिधी) :
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अमळनेर येथे आज दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी परिसरात विचारांचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर प्रमोद पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा परिचय करून देत त्यांच्या महान कार्याची सविस्तर माहिती दिली. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून जीवनात प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी आयटीआयचे प्राचार्य प्रकाश पाटील सर, समाधान शिरसाठ सर, विजय चौधरी सर, सखाराम पावरा तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व सामाजिक जाणिवा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *