अखिल भारतीय कुशवाहा महासभेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी भीमराव महाजन यांची निवड;*
![]()
*अखिल भारतीय कुशवाहा महासभेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी भीमराव महाजन यांची निवड;*
भोपाल : अखिल भारतीय कुशवाहा महासभेची राष्ट्रीय बैठक 12 एप्रिल रोजी भोपाल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजहिताचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत अमळनेर येथील माळी समाजाचे मुखपत्र “माळीभूषण” चे संपादक भीमराव महाजन (महाराष्ट्र) यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. वर्मा (पटना, बिहार) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मानवेन्द्र कुशवाहा तसेच राष्ट्रीय महासचिव नारायण सिंह कुशवाहा यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, श्री महाजन यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील समाज संघटनाला नवी दिशा व बळ मिळणार आहे.
अखिल भारतीय कुशवाहा महासभेची स्थापना सन 1902 मध्ये झाली असून, देशातील विविध राज्यांमध्ये ही संघटना सक्रियपणे कार्यरत आहे. समाजातील एकता, प्रगती आणि संघटन बळकट करण्यासाठी महासभा सातत्याने प्रयत्नशील आहे.
ही नियुक्ती केवळ एक पद नसून समाजसेवा, नेतृत्व आणि जबाबदारीची मोठी संधी मानली जात आहे. भीमराव महाजन यांच्याकडून समाजाला एकत्रित आणणे, युवकांना प्रेरणा देणे आणि सामाजिक विकासाला चालना देणे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीमुळे अमळनेर येथील माळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा निर्णय संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. अमळनेर येथे भीमराव महाजन यांच्या या सुयोग्य निवडीतून भविष्यातील माळी समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास येत आहे, असेही मानले जात आहे.
भीमराव महाजन हे माळीभूषण वृत्तपत्राचे संपादक असून, महाराष्ट्र माळी समाज महासंघ तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनांमध्येही ते सक्रियपणे कार्यरत आहेत.

