अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अभिवादन
1 min read

अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अभिवादन

Loading

अमळनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनिल पाटील, देविदास देसले,नरेंद्र पाटील, सुनिल भोई,महेश पाटील, नारायण बडगुजर आदींनी पुष्पहार अर्पण करून समितीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी ‘जय भीम’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.समितीच्या कार्यकर्त्यांसह भीमसैनिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *