महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेची रंगत  ,महात्मा, फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1 min read

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेची रंगत ,महात्मा, फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

*’प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न*
● भगवान महावीर,महात्मा
फुले,डॉ.आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त उपक्रम
● सी सी एम सी,युवती सभा,
आई जिजाऊ अभ्यासिका
यांचा संयुक्त उपक्रम
● १४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे
सहभाग
● प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील, प्रा.गुलाले, डॉ.भुसनर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन.
—————————————-
अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर, युवती सभा, आई जिजाऊ अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जयंती,महात्मा फुले जयंती,भारतरतन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ११:३० दरम्यान करियर कौन्सिलिंग सेंटर येथे भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न झाली. या सामान्य ज्ञान परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ.धीरज वैष्णव,रेक्टर डॉ.अमित पाटील, डॉ.माधव भुसनर,प्रा.भानुदास गुलाले, डॉ.आर सी सरवदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी प्रताप महाविद्यालयातील कार्यालयात सुद्धा प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ठीक १० वाजता सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले, यावेळी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव,सीसीएम प्रमुख डॉ विजय तुंटे,डॉ.धनंजय चौधरी,प्रा.सुनिल पाटील यांच्यासह प्रा.पंकज तायडे, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.रवी बाळसकर, डॉ.अनिल झळके, डॉ.रामदास सुरळकर,प्रा.दिपक कोकणी आदी उपस्थित होते. प्रस्तुत सामान्य ज्ञान परीक्षेच्या यशासाठी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे डॉ.बालाजी कांबळे,दिलीप शिरसाट,पराग पाटील प्रा.हिमांशू गोसावी, विशाल अहिरे,
डॉ.राखी घरटे,प्रा.इशिता घोष,तुषार संजय पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
*सामान्य ज्ञान परीक्षेचे स्वरूप*
१) प्रथम पारितोषिक रुपये १०००, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र (डॉ.एस ओ माळी सर यांच्या तर्फे),
२) द्वितीय पारितोषिक रुपये ७००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र (आई जिजाऊ अभ्यासिका,अमळनेर)
३) तृतीय पारितोषिक रुपये ५००,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
(आई जिजाऊ अभ्यासिका)
४) उत्तेजनार्थ प्रथम रुपये ३००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र (महेंद्र नेरकर यांच्याद्वारे)
५) उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रुपये ३००,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
(महेंद्र नेरकर यांच्या तर्फे).
अशा पद्धतीने पारितोषिकाचे स्वरूप राहणार आहे,प्रस्तुत सामान्य ज्ञान परीक्षेत गुणाणूक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सीसीएमसी विभागात बक्षीस वितरण केले जाणार आहे,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *