अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा
![]()
अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा
अमळनेर : येथील मराठी वाङ्मय मंडळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
कार्यक्रमास सोमनाथ ब्रम्हे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, अजय केले, डॉ. रमण पाटील, के. व्ही. कुळकर्णी, हनुमंत पाटील, हेमंत बाळापुरे, तसेच कुळकर्णी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

