डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
![]()
डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
अमळनेर प्रतिनिधी
खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत महामानव , विश्वरत्न , भारतरत्न सन्मानीत बहुजनांचे कैवारी डाॕ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाने रुबाबदार पध्दतीने साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमे चे पुजन आगरबत्ती ,मेणबत्ती , पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.यावेळी अध्यक्षतेस्थानी विदयालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर मॕडम होत्या.यावेळी विचारमंचावर पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर ,जेष्ठशिक्षक श्री एस एस माळी , जेष्ठशिक्षक श्री एस एस वाघ , जेष्ठशिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॕडम ,सौ पी पी जोशी मॕडम ,श्री शामभाऊ पवार , श्री के आर बाविस्कर होते.
या वेळी जेष्ठ शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॕडमांनी महामानवाच्या गिताच्या माध्यमातुन कार्याची आढवण व त्यांचे सर्व भारतीयासाठी दिलेले योगदान तसेच बहुजनांसठी घटनाच्या माध्यमातुन अधिकार , महिला अधिकार अश्या अनेक योगदानाबद्दल सखोल विश्लेषण त्यांनी भाषनातुन मांडले.
अध्यक्ष यांच्या भाषनातुन बाबासाहेब बालपण , शिक्षण , राज्यघटना अश्याबद्दल सखोल माहिती सांगुन सर्वाची मने जिकंली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती एस एस देवरे मॕडम ,तरआभार श्री के आर बाविस्कर यांनी केले.संपुर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

