ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी) १४/०४/२०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री डी. ए. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना श्री. निर्मल चतुर सर व श्री. चंद्रकांत कोळी सर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्य व विचारांविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता वाढीस लागून महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा ठसा उमटला.

