बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक
![]()
बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील
जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक
अमळनेर:- आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार बोहरे येथील पाडळसरे धरणाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात आमदार व बोहरे ग्रामस्थ यांची सर्व अधिकाऱ्यांसहित बैठक पार पडली.
बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे व अधिकारी वर्गासोबत बोहरे येथील प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन बोहऱ्यावर विशेष लक्ष्य देऊन पुढील तापी महामंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे व प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत.यामुळे बोहऱ्याचा इतक्या वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्गांवर असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सदर बैठकीनंतर सर्व उपस्थित ग्रामस्थ व शेतकरी यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले असून प्रश्न मार्गी लावत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त केले.
या बैठकीत माजी मंत्री, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे ,तापी पाटबंधारेचे महाजन व य. म.कडलग सर्व महसूल अधिकारी व ग्रामस्थ अनिल अहिरराव , यशवंत पाटील, दीपक पाटील,सुभाष बागुल, हेमंतराव विंचूरकर, कैलास विंचूरकर,रतन धनगर,अशोक कोळी,दिलीप कोळी,सुधाम बागुल, मनोज रत्नपारखी,प्रमोद बागुल,जयेश बागुल,भूषण धनगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

