अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद, “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार
![]()
अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद
“बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) काम चालु आहे, तब्बल २४ वर्षांनंतर निवडणुक आयोगाने हाती घेतलेले हे केवळ अभियान आपला मतदार ओळखुन त्याचे मॅपिंग करतांना संघटनात्मक बुथ प्रमुखाची खरी कसोटी लागणार आहे. मतदार यादीवर आताच लक्ष दिले तर येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेची निवडणूक आपणास अवघड जाणार नाही. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आपला हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहु नये तसेच बोगस मतदार देखील शिल्लक राहता कामा नये यासाठी शिवसेना पक्षाच्या BLA ने SIR च्या मैदानात उतरावे, माझा नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश झाला आणि पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिदे साहेब, संसद रत्न खासदार डाॅ. श्रीकांतजी शिदे साहेब, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी माझ्यावर नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्यांचा मी ॠणी आहे तसेच हे पद मला मिळाले याचे सर्व श्रेय पदाधिकारी व शिवसैनिकांचे आहे हे मी विसरणार नाही. आगामी काळात नंदुरबार लोकसभा मतदार संघ व अमळनेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावा गावात शिवसेना व घरा घरात शिवसेनेचे विचार पोहोचविण्याचे काम मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मा.आ.शिरीषदादा चौधरी यांनी सत्काराला उत्तर देतांना सागितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार श्री.अमोलदादा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा पालक आमदार असुन शिवसेनेच्या आढावा बैठकीस उपस्थित राहीलो पण जो पर्यंत अमळनेर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकत नाही तो पर्यंत प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहुन काम करत राहील आणि मतदारसंघातील गावे विकासापासून वंचित राहणार नाहीत यांची देखील काळजी घेऊ, संघटनेत किती ताकद असते हे नगरपरिषद निवडणुकीत सिध्द झाले आहे व बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा आहे, बुथ मजबुत असेल तर निवडणुक जिंकण्यास सोपी होते म्हणुन प्रत्येक बुथ प्रमुखाने आपल्या मतदार यादीचा सखोल अभ्यास करून मतदारांची अचुक माहिती संकलित करावी असे सांगितले.
या अभियानाला अधिक परिणामकारक व मजबुत करण्यासाठी ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून विधानसभाक्षेत्र निहाय आढावा बैठकीच्या माध्यमातुन प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे सौ. सरिताताई माळी, महिला आघाडी समन्वयक यांनी मनोगतात सांगितले.
प्रशिक्षण शिबिरात SIR अभियानाचे महत्व, मतदार पडताळणीचे महत्व, डिजिटल मॅपिंग आणि बुथ नियोजन याबाबत ॲड. ललिताताई पाटील सविस्तरपणे मांडणी करुन सांगितले.
संघटनेच्या माध्यमातुन सुरु असलेले मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम प्रत्येक पदाधिकाऱ्यानी जबाबदारीने पार पाडावे व आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख श्री. वासुदेव पाटील यांनी केले.
प्रास्ताविकात तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी SIR अभियानाचे महत्व अधोरेखित करीत ज्यांना काम करायची इच्छा असेल त्यांनीच जबाबदारी घ्यावी असे सांगितले अन्यथा स्वतः हुन पदमुक्त व्हावे अशा कठोर शब्दात सांगितले.
सूत्रसंचालन श्री चंद्रकांत कंखरे सर यांनी केले.
कार्यकमास श्री. विष्णुभाऊ भंगाळे, (जिल्हाप्रमुख शिवसेना), श्री. रोहित कोगटा (जिल्हाप्रमुख युवासेना), सुरेश पाटील (विधानसभा क्षेत्रप्रमुख), भरत पवार (शहर प्रमुख), विलास कंखरे (शहर प्रमुख), साहेबराव दादा पवार (सभापती, बांधकाम), कैलास पाटील (सभापती, पाणीपुरवठा), नाविद शेख (सभापती, शिक्षण), महेश देशमुख (गटनेते), श्रीराम चौधरी (नगरसेवक), अबू महाजन (नगरसेवक), दिपक चौगुले (नगरसेवक), सुयोग धनगर (नगरसेवक), पांडू आप्पा भोई, बाळासाहेब संदानशिव, गुलाम नबी पठाण, गुणवंत पाटील, चित्रलेखा महाजन (महिला आघाडी), तुषार पाटील (सोशल मीडिया), मनिषा दिपक पाटील, चंद्रकांत पाटील (माजी उपसभापती, पारोळा), गोकुळ चौधरी (माजी उपसभापती, पारोळा), भैय्यासाहेब पाटील (अध्यक्ष, शेतकी संघ, पारोळा), साहेबराव पाटील (शेतकी संघ संचालक), डॉ. दिपक पाटील (माजी सभापती, अमळनेर), एन आर ठाकरे (वावडे), शशी पाटील (धार), किरण गोसावी (नगाव बु), रमेश चौधरी (कळमसरे), रावसाहेब कोळी (मांडळ), मच्छिंद्र जाधव (वसंतनगर), पंकज शेटे (विधानसभा क्षेत्रप्रमुख युवासेना),राहुल कंजर (युवासेना तालुकाप्रमुख), प्रविण पाटील (शहरप्रमुख, युवासेना) यांच्यासह असंख्य शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.



