जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भक्तिमय कावड यात्रा उत्साहात
1 min read

जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भक्तिमय कावड यात्रा उत्साहात

Loading

जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भक्तिमय कावड यात्रा उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनी येथील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य पायी कावड यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी पायी प्रवास करत भगवान शिवाच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला.

सकाळपासूनच कावड यात्रेसाठी भाविकांची लगबग सुरू झाली होती. जळोद येथून कावड घेऊन भाविकांनी मंदिराच्या दिशेने पायी प्रस्थान केले. मार्गभर ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ अशा जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभागी झालेल्या भाविकांमुळे यात्रेला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.
यात्रेदरम्यान अंमळगाव येथे जयंत पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेमुळे सहभागी भाविकांनी समाधान व्यक्त केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या कावड यात्रेत प्रभाग 16 चे सामाजिक युवा कार्यकर्ते रवि पाटील यांच्यासह संजय पाटील, अशोक साळूंखे, अमोल पाटील, सुनील शिगांणे, राहुल सोनवणे, प्रविण गुजर, विवेक तेले, कल्पेश साळूंखे, नरेंद्र गुजर, प्रविण महाजन, विवेक पाटील, सागर पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भगीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, प्रविण वाघ, सुभाष चव्हाण, दीपक गुजर, सिद्धार्थ पाटील यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर असा पायी प्रवास पूर्ण करून कावडधारी भाविकांनी भगवान विद्येश्वर महादेवाचे दर्शन घेतले. धार्मिक श्रद्धा, सामूहिक सहभाग आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या कावड यात्रेत पाहायला मिळाला. त्यामुळे यंदाची कावड यात्रा परिसरातील भाविकांसाठी भक्ती आणि उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *