आत्मसन्मान व शिक्षणाच्या चळवळीने समाज परिवर्तन घडवले – प्रा. डॉ. राहुल निकम , कळमसरे येथे महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
1 min read

आत्मसन्मान व शिक्षणाच्या चळवळीने समाज परिवर्तन घडवले – प्रा. डॉ. राहुल निकम , कळमसरे येथे महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात

Loading

आत्मसन्मान व शिक्षणाच्या चळवळीने समाज परिवर्तन घडवले – प्रा. डॉ. राहुल निकम,

कळमसरे येथे महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात

 

अमळनेर प्रतिनिधी

कळमसरे (ता. अमळनेर) येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांनी मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांनी राबवलेली चळवळ ही आत्मसन्मानाची चळवळ होती, असे प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले की, फुले यांच्या कार्यातून सामाजिक व शैक्षणिक जागृती निर्माण झाली आणि समाज व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून आले. बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या आत्मभानाची जाणीव करून देण्यात महात्मा फुले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या विचारांमुळेच महाराष्ट्राला पुरोगामी ओळख प्राप्त झाली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावाचे सरपंच जगदीश निकम यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पिंटू राजपूत, युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेरचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार तसेच बापूराव ठाकरे उपस्थित होते. यावेळी प्रा. अशोक पवार यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेले महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे पत्रक उपस्थितांना वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मोतीभाऊ महाजन यांनी केले. शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला. कार्यक्रमाच्या यशासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *