अमळनेरमध्ये शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; बुथ प्रमुखांच्या उपस्थितीत SIR वर सखोल मार्गदर्शन मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नियुक्तीचा सत्कार; उद्या इंदिरा गांधी भवन येथे राजकीय घडामोडींना वेग
![]()
अमळनेरमध्ये शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; बुथ प्रमुखांच्या उपस्थितीत SIR वर सखोल मार्गदर्शन
मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नियुक्तीचा सत्कार; उद्या इंदिरा गांधी भवन येथे राजकीय घडामोडींना वेग
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरात उद्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी भवन येथे शिवसेनेतर्फे बुथ प्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मतदारयादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत बुथ प्रमुखांची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मा. आ. शिरीषदादा चौधरी यांची नंदुरबार लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमास आ. अमोलदादा पाटील (पारोळा-एरंडोल-भडगाव), जिल्हाप्रमुख श्री. विष्णुभाऊ भंगाळे व श्री. वासुदेव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. सरिताताई माळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. रोहित कोगटा, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, हिरा उद्योगचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी, शिवसेना नेत्या ॲड. सौ. ललिताताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय नगरपरिषदेचे गटनेते श्री. पंकज चौधरी, बांधकाम सभापती श्री. साहेबराव दादा पवार, पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील, शिक्षण सभापती तथा प्रतोद श्री. नाविद शेख,बाळासाहेब संदानशिव,तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने विधानसभा मतदारसंघातील सर्व शाखाप्रमुख, बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसह राजकीय रणनीतीला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

