अमळनेरमध्ये पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
![]()
अमळनेरमध्ये पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) :
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे विश्वस्त बापूसाहेब नगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रंथालय परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित वाचकांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला वाचक वर्गातून हिरालाल कोळी सर, दिलीप शिंपी, वाल्मीक सर कोळी, वैभव चाफेड, चंद्रकांत पुरकर, जितेंद्र पाटील, वैभव छाजेड तसेच कर्मचारी मधुकर बाळापुरे आदी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

