मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.
1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.

ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे धुळे जिल्ह्यातील नवलाने येथील सुपुत्र, छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कल्याण पूर्व मधील मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना
मुंबई येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल आहेर यांचा कडून ” शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
लक्ष्मी शिक्षण प्रत्येक वर्षी लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे सन. 2017 पासून विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी व शिक्षक बंधू भगिनींना प्रेरणा मिळावी यादृष्टीकोणाने प्रत्येक वर्षी लक्ष्मी शैक्षणिक संस्थेमार्फत पुरस्कार प्रदान व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षी आदर्श मराठी शाळा
इंग्रजी संभाषण स्पर्धा
निबंध स्पर्धा
इत्यादी आयोजित करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 12 एप्रिल २०२६ रविवार रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंत्रालयाजवळमुंबई ३२ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख , रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील,छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे,छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस निलेश रेवगडे तसेच छत्रपती शिक्षण मंडळाचे इतर सन्माननीय सदस्य अभिनव मुख्याध्यापक संपत गिते,नूतन विद्यालयाचा मुख्याध्यापिका सय्यद मॅडम,विद्या मंदिर मांडा टिटवाळा उपमुख्याध्यापक प्रमोद पाटील
शारदा विद्या मंदिर पडघा येथील उपमुख्यद्यापक ज्ञानेश्वर घुगे
नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सौं.अश्विनी गरवारे व
इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
ज्ञानेश्वर काटकर, सुरेश महाजन, शिवराज चौरे, सुधीर वंजारे यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग, मित्रमंडळीकडून यांच्याकडून विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कल्याण पूर्व चे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *