अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती   अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
1 min read

अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

 

अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती

अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी) :
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. सुरेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. १४, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ नुसार ही नियुक्ती मंजूर करण्यात आली असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अधिकृत नियुक्ती आदेश प्रदान केले आहेत.
नियुक्तीनुसार ॲड. सोनवणे हे अमळनेर नगरपरिषद विरुद्ध दाखल होणाऱ्या विविध दावे, खटले, दरखास्ती व कॅवेट प्रकरणांमध्ये नगरपरिषदेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच जिल्हा सत्र न्यायालयात ते नगरपरिषदेच्या वतीने काम पाहणार असून दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये त्यांची पॅनेल वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. सुरेश सोनवणे हे २०१४ पासून वकील व्यवसायात कार्यरत असून त्यांनी अल्पावधीतच आपल्या अभ्यासू वृत्ती, काटेकोर कामकाज व कायदेशीर ज्ञानाच्या जोरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. ते सेंट्रल बँक तसेच अर्बन बँकेच्या पॅनेलवरही कार्यरत असून विविध महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावी बाजू मांडली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी आमदार शिरीष दादा, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. परिक्षीत बाविस्कर, पंकज चौधरी, श्रीराम चौधरी, अबू महाजन, महेश बापू देशमुख

क्षेत्रीय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील, दिनेश माळी, डॉक्टर उदय खैरनार, विजय माळी, एडवोकेट नागराज माळी , अहिराणी साहित्य गोकुळ बागुल,
व सर्व क्षेत्रीय फुलमाळी पंचमंडळ ,संत सावता माळी मित्र मंडळ अमळनेर, सीनियर वकील मंडळी अंमळनेर यांनी अभिनंदन केले

यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नगरपरिषदेच्या कायदेशीर कामकाजात अधिक कार्यक्षमता व सक्षम प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *