ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,
![]()
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,
उत्तर प्रदेश,ग्रेटर नोएडा: समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम व समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील समर्पित भावनेने लोकसेवा करणारे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक,डॉ. रवींद्र भोळे यांना अपर पोलीस आयुक्त डॉक्टर राजीव नारायण मिश्र यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर प्रथम राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र ,शाल , पुष्पगुच्छ , स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आपले मार्गदर्शन करताना अपर पोलीस आयुक्त डॉ. राजीव नारायण मिश्र यांनी सांगितले की राष्ट्र गौरव पुरस्कारामुळे आपल्या देशाची शान वाढत असते. यामुळे कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा निर्माण होऊन राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळते. याप्रसंगी व्यासपीठावर पी आय आय टी कॉलेजचे अध्यक्ष, एस के एफ आय चे संरक्षक प्रोफेसर डॉ. भरत सिंह, पूर्व कुलपती प्रोफेसर बी एस राजपूत, एस के एफ आय चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र बच्चन, डॉ. रवींद्र भोळे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. रवींद्र भोळे यांनी 35 वर्षे पासून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य केलेले आहे. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, अध्यात्मिक , प्रवचनातून व्यसनमुक्ती,कोरोना पेंडेमिक, वृक्षारोपण, मराठवाडा भूकंप ,नैसर्गिक आपत्तीत मदत,मूकबधिर मतिमंद सेवा इत्यादी सह अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य केलेले आहे. राज्यभर 20हून अधिक अपंग सामाजिक धार्मिक ,शैक्षणिक, संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. मॅगसेस अवॉर्ड विजेते पद्मश्री डॉमणी भाई देसाई ट्रस्ट व प्रतिष्ठान स्थापुन त्यांनी पर्यावरण, युवकांसाठी उपक्रम राबविले आहेत. तसेच डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा गेली 35 वर्षे पासून ते देत आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत.ह्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातून अमोल पाटील सामाजिक कार्य, दिघी भोसरी, जयवंत विनायक सिसोदे पुणे यांना शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला एस के एफ आय चे संघटक सत्यनारायण प्रधान, कोषाध्यक्ष अमित सक्सेना, महासचिव सिद्धांत श्रीवास्तव, ललिता कच्छप, दीपक कुमार जंगल, राम स्वरूप भटनागर, दिनेश चंद्र गुप्ता कुमार अभिनव अशोक श्रीवास्तव हे एस के एफ आयचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो बबलू रावत ह्यांनी केले. निर्देशक आर के शक्य नाही धन्यवाद दिलेत. हा कार्यक्रम पी आय आय टी कॉलेज सभागृह ग्रेटर नोएडा येथे पार पडला.

